एखाद्या दलिताला त्याच्या जातीवरुन हाक मारणे अपमानास्पद वाटू शकते. जातीवाचक शब्दाला चिकटलेल्या हीनत्त्वाच्या अर्थामुळे असे झाले असावे. त्यामुळे अर्थ पोचवणारा पण दुसरा सौम्य शब्द वापरणे योग्य आहे. (कृष्णवर्णीयांना जसे निग्रो म्हणण्याऐवजी आधी ब्लॅक आणि आता आफ्रिकन-अमेरिकन म्हटले जाते तसेच हे).

त्याचबरोबर उच्चवर्णीय/ मागासवर्गीय असे म्हटल्याने नक्की कोण ते स्पष्ट होत नाही व तेढ न वाढण्याच्या दृष्टीने एक उपयुक्त संदिग्धता राहते.


वरच्या जातीतला, खालच्या जातीतला असं म्हणवण्यापेक्षा अमक्या जातीचा असा स्पष्ट नावानिशी उल्लेख कोणत्याही जातीच्या माणसाला अधिक अभिमानास्पद/स्वीकारार्ह असेल.
उच्चवर्णीयांना स्वतःची जात उच्चारणे अभिमानास्पद वाटू शकेल मात्र दलितांना तसे वाटत नसावे.