वरील मतांशी एकंदरीत सहमत आहे. विशेष आवडलेले म्हणजे स्विय सहायिकेला लग्गा लावून, तिला दुसरे काही लष्टक नसल्याने,गचका उकडलेला भात असे बरेचसे .
चीनला जायचे तर सिंगापुरला लेकराला भेटुनच जावे असा विचार करून
आस्थापनेच्या पर्यटन संस्थेला सिंगापुर मार्गे प्रवासाची व्यवस्था करायला
सांगितली तर त्यांनी नकारघंटा वाजवली. म्हणे सिंगापुर एअरलाईन्सने पर्यटन
संस्थांना अडत देणे बंद केल्याने सर्व पर्यटन व्यावसायिक संस्थांचा
सिंगापुर एअरलाईन्सवर सध्या बहिष्कार आहे. त्यांनी शिताफीने हॉंग कॉंग,
कुआला लुंपुर, बॅंकॉक अशा तीन रुपरेषा आखून दिल्या. पण जाणार तर पोराला
भेटुनच जाऊ यावर मी ठाम होतो. मग मी सिंगापुर एअरलाईन्सच्या संस्थळावर
गेलो आणि चार दोन वेळा मागे पुढे होता करता अखेर हव्या त्या तारखांची
तिकिटे जमवली. आता एक गोची होती; आमच्या आस्थापनेचा नियम आहे की
आस्थापनेने निश्चित केलेल्या पर्यटन संस्थे व्यतिरिक्त कुणीही अन्यत्र
तिकिटे विकत घेऊ नयेत आणि या नियमाला बगल द्यायची असेल वित्त - लेखा वगैरे
मंडळी काड्या करतात. मग अखेरचा मार्ग - व्यवस्थापकिय संचालकांची परवानगी.
नेमके साहेब त्या दिवशी बाहेर होते.
हे वाचताना बाकी उगीचच तोंडात कवळी घातली आहे असे वाटत होते!