नीलहंस,
छान गझल. (तुमच्या इतर गझलांच्या तुलनेत थोडी कमी घोटीव वाटली) खालील शेर विशेष आवडले.
तुझ्यावाचून संध्याकाळ माझी लांबली होती
तुझ्या पदरात सोनेरी उन्हे मी बांधली होती
सुदैवाने तिला प्रेमात हे कळलेच नाही की
बरा होतो जरासा मी, तशी ती चांगली होती
तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला
स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?