उत्तम!
"शिक्षण म्हणजे सर्वांगिण विकास", हे आजकाल फक्त शिक्षण स्नातक (बी. एड. ) परीक्षेत उत्तीर्ण होण्यापुरतं मर्यादित राहिल की काय असं वाटतं. वेगवेगळ्या कलांचा अभ्यास व्हावा यासाठी त्या-त्या क्षेत्रातील व्यावसायिकांना शाळेत बोलावता येइल.
सुचना खरच चांगल्या आहेत, पण यासाठी शाळेची वेळही वाढवावी लागेल. गृहपाठाऐवजी शाळेतच अभ्यासक्रम पुर्ण करून घेणे योग्य. फक्त दोन पाळीत चालणाऱ्या शाळांना त्रास होउ शकतो, त्यासाठी उपाय शोधावा लागेल.
सेवानिवृत्त पोलिस व सैनिकांना शाळेत खेळ, शारिरिक शिक्षण यासाठी नियुक्त करणे अधिक परिणामकारक राहिल, व मुलांना अनायसे सैन्यातील व पोलिस दलातील संधीचा लाभ घेता येइल.
विषय आवडला.