भीती वाटणं साहजिक आणि नैसर्गिक आहे. कधीकधी भीतिने घाम फुटणे, अंगाचा थरकाप होणे हे ही सामान्यच. पण जेंव्हा भीतीमुळे शरिरावर किंवा मनावर परिणाम घडू लागतात तेंव्हा त्याला "मानसिक रोग" म्हणता येइल. (फोबिया)
काही वाईट घडलय किंवा घडेल, याची भीती बाळगणे योग्य नाही. याच एक उदाहरण देतो. आम्ही मसुरीला घाटात चढत होतो, खालचा भाग अतिशय खोल दिसत होता. त्यात सौ. म्हणाली, "जर इथून आपण खाली पडलो तर...., मला भीती वाटते" मी म्हणालो, " आपण इतक्या वर आहोत की इथून जर आपली गाडी पडली तर काय होइल हे बघायला आपण जीवंत राहणार नाही, आणि मेल्यावर कसली भीती? त्यामुळे पडलो तर काय यापेक्षा पडल्यावर जिवंत राहिलो तर काय याची भीती वाटायला हवी"
आणि भविष्याची काळजी करून वर्तमान कशाला खराब करायचा ?