खूप नेमकी आणि नेटकी रचना आहे.
सहमत.

श्रावणातला पाउस येतो-जातो;
पावसातले भिजणे झाले बंद!...
वाट कुणाची कोणी पाहत नाही;
डोळे लावून बसणे झाले बंद!...
अतिशय सुरेख!


'अजब' मनाला सुचेल ते-ते लिहितो;
'कोणासाठी' लिहिणे झाले बंद!...
वा. 'कोणासाठी'ची अवतरण चिन्हे काढून टाकल्यास त्या ओळीचा दुसरा अर्थही दाखल होण्यास अधिक मदत होईल असे वाटते. चूभूद्याघ्या.