पुलंच्या "रावसाहेब'मध्ये सगळ्यात जास्त दंगा रावसाहेबांचा असे, तसाच दंगा आमच्या ग्रुपमध्ये "राजा' करायचा. त्याची विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा अफाट होता. विनोदाला फार काही दर्जाबिर्जा होता, असं नव्हे. पण कॉलेजातल्या टिंगलटवाळ्यांमध्ये तो अव्वल होता.
माझ्या कॉलेजातही असाच एक मुलगा होता. कॉलेजकट्ट्यावर तो नुसता तळपत असे. मात्र पुढे मोठा झाल्यावरही अजून मनाने तो कॉलेजकट्ट्यावरच असल्यासारखा वागतो तेव्हा नकोसे वाटते हे मात्र खरे