मी तुमच्या अनुभवाशी सहमत आहे. मला सुद्धा खुपवेळा अनुभव आलेला आहे. मला सुद्धा भविष्यातील घटना स्वप्नात दिसल्या आहेत जरी त्या घटना आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या नसल्या तरीदेखिल. मला  एखादी गोष्ट घडण्याच्या १-२ महिने किंवा काही वर्षाआधीसुद्धा कळते आणि मनात विचार येतो की अरे हे आपण पुर्वी स्वप्नात पाहिलेले आहे. उदा. मी आमच्या नातेवाईकांसोबत घरी टि. व्ही पाहत जेवत होतो. टि. व्ही वरिल कार्यक्रम आणि आजुबाजुची परिस्थिती मी स्वप्नात पाहिलेली आहे असे लक्षात आले एव्हाना हेच नव्हे तर पेपरमधील एखादी बातमी सुद्धा स्वप्नात वाचली आहे असे जाणवते. परंतु या घटना स्वप्न पाहिल्यानंतर लक्षात राहत नाहीत. ज्यावेळी ती घटना घडत असते किंवा तशी परिस्थिती असते त्यावेळी जाणवते. एका वाचकाने फ्रॉईडच्या अभ्यासाचा भाग दिला आहे तो खरा आहे पण त्यांनी दिलेली उदाहरणे ही शाररीक हालचालींशी संबंधीत आहेत आणि ते सुद्धा आपण झोपलो असता असे अनुभव येतात परंतु आपल्याला जागेपणी येणाऱ्या अनुभवांचे काय?