माझ्या लेखाच्या निमित्ताने ऋचा मुळे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला मी त्या लेखाखाली उत्तर दिलेच आहे. तेच इथे उद्धृत करते की

तसं बघायला गेलं तर कुठल्याही प्रकारे जातीचा उल्लेख करण्याच्याच मी विरोधात आहे. पण विशेषतः राजकीय पार्श्वभूमीचं कुठलंही लेखन त्या उल्लेखाशिवाय अजूनतरी शक्य नाही. 'ब्राह्मण' शब्द वापरायला माझी हरकत नाही पण तरीही त्यासोबत 'तथाकथित' हा शब्द मला वापरावासा वाटेलच. 'तथाकथित' नं 'उच्चवर्णीय' ची धार ना कमी होते ना परजली जाते पण माझा उपहासात्मक सूर देण्याचा उद्देश सफल होतो असं मला वाटतं.