'शिक्षण' बदलायचे कि, शिक्षणाकडे पाहण्याचा 'दृष्टीकोन' बदलायचा?
खरे म्हणजे दोन्हीत सुधारणांचा वाव आहे. आज जर एखादा पहिलीत असेल तर १०-१२ वर्षाने जे जग असेल त्या जगात जगण्यास लायक व्यक्तिमत्व बनवणे आवश्यक आहे.
शिक्षणात माध्यमिक, प्राथमिक शिक्षणात सुधारणा हवी आहे असे नसुन कॉलेजपातळीवरही तितकीच सुधारणा होणे गरजेचे आहे.
तसेच शहरी, ग्रामीण भागातील गरजा ओळखून त्या त्या प्रमाणे "ईलेक्टिव्ह" टॉपिक जर असतील तर मुलांना त्यांच्या गरजे प्रमाणे शिक्षणच नव्हे तर एखाद्या डिग्रीतील विषयसुद्धा निवडण्याची मुभा मिळेल.