जेव्हा केव्हा उच्चवर्णीय हा शब्दप्रयोग मी वाचला ऐकला आहे, तेव्हा अभिप्रेत समाजघटक ब्राह्मण असल्याचा अनुभव मला आहे. याशिवाय, राजकीय हेतूने वापरला जाताना, किंवा जातीयवादासंदर्भात टीका करताना उच्चवर्णीय शब्दाने कायम ब्राह्मणांची संभावना केल्याची उदाहरणे आहेत.
मला प्रामाणिकपणे माहित नाही म्हणून मी प्रश्न विचारलाय. कारण दैवज्ञ ब्राह्मण (सोनार), मराठा, कायस्थ प्रभू यांच्यासकट सगळ्यांना ब्राह्मण "खालचे" समजतात, आणि तेही ब्राह्मणांना "वरचे" समजतात असा अनुभव मी घेतला आहे. खरंतर ब्राह्मणा-ब्राह्मणांतही कोकणस्थ स्वतःला देशस्थ, कऱ्हाडे यांच्यापेक्षा वरचे मानतात असं दिसतं. मग उच्चवर्णीय म्हणजे नेमके कोण कोण असा प्रामाणिक प्रश्न मला पडला आहे.
ब्राह्मण हे चार वर्णांपैकी एकाचं नाव आहे हे मान्य, पण आपले संदर्भ काळानुसार बदलले पाहिजेत. सध्याच्या समाजात वर्णव्यवस्था नव्हे जातिव्यवस्था आहे, त्यासंदर्भात ब्राह्मण हे एका जातीचं नाव आहे हे विधान सुसंगत आहे.
ते जातीचं / वर्णाचं कशाचंही नाव मानलं तरी मूळ मुद्दा हे नाव घ्यावं की उच्चवर्णीय वगैरे शब्द वापरावेत असा आहे.