खरे तर मी माझा हा प्रतिसाद 'गंधाच्या उलाढालीचे' विडंबन वाचल्यावरच देणार होतो, पण तो मला आलेला 'राग' आहे असा गैरसमज झाला असता म्हणून दिला नाही.

प्रेरणेच्या कवितेला फक्त 'अप्रतिम' म्हंटले की पुढे कसेही विडंबन करायला हरकत नाही असा समज कृपया करून घेऊ नये.

मुळात म्हणजे अशा रचना करणे हे विडंबन नव्हे. विडंबनामुळे कुठल्यातरी सामाजिक प्रश्नावर, चुकीच्या रुढींवर किंवा अन्याय्य गोष्टींवर टीका व्हायला हवी. त्यासाठी 'ओरिजिनल' रचनेच्या जमिनीवर विडंबन रचले जाते, ज्याने ते प्रसिद्ध व्हायला मदत होईल.

मात्र आपल्या अशा विडंबनांमध्ये ही टीका 'मूळ कवीवरच' झाल्यासारखी वाटते. खरे तर ती टीका न वाटता एक सवंग किंवा स्वस्त रचना वाटते ज्याच्यात मूळ कवितेची जमीन वापरली आहे.

आपल्याला तसे विडंबन-काव्य रचायचे असल्यास कुणीच काही म्हणू शकणार नाही. काही काळ त्याच्यामुळे एक विनोद निर्माण झाल्याचा भास होईल. पण कवितेच्या प्रगतीला हातभार लागेल असे मला व्यक्तिशः वाटत नाही.