बरोबर! मूळ मुद्दा 'विशिष्ट पद्धतीने उल्लेख करावा' की 'जातीचे नांव उच्चारावे' हा आहे.
माझ्यामते 'उच्चवर्णीय' वगैरे उल्लेख करून लोक पळवाट काढतात. वर त्याच्यामुळे 'जातीयता' पेटतेच!
याचे कारण असेः जर 'ब्राह्मणेतर' जातीतील एखाद्या लहान मुलाने वडिलांना हा प्रश्न विचारला की 'उच्चवर्णीय' म्हणजे काय? तर वडील जर असे म्हणाले की 'बेटा श्रीमंत, खूप शिकलेले किंवा मोठे लोक' म्हणजे उच्चवर्णीय तर ठीक आहे. पण वडील जर असे म्हणाले की 'उच्चवर्णीय ब्राह्मणांना म्हणतात बेटा' तर तो मुलगा पुढे ब्राह्मणांचा तिरस्कार करू शकेलही. हे कशामुळे होईल? तर ब्राह्मणांचा उल्लेख ब्राह्मण असा न करता वेगळा केल्यामुळे.
मी ऋचा ( आता मला ऋ लिहिता येतो, थँक्स) मुळे यांच्याशी सहमत आहे.
मला तर वाटते की 'जातीयवाद' सुलगता राहावा असाच तर विचार नसेल ना असे लिहिणाऱ्यांचा?