केवढे खोटे खऱ्याच्यासारखे
की खरे खोटेच झाले शेवटी
वा!

वाटले राहील ते अल्लड सदा
हृदय हे कळतेच झाले शेवटी
वा.

हालचाली आमच्या थंडावल्या
व्हायचे होतेच, झाले शेवटी
वा. व्हायचे होतेच, झाले शेवटी हे अगदी मस्त आले आहे. माझ्यामते अशा ओळी  गझलेची खासियत असतात.

मतला आणि प्यारेचही आवडले.. तू न माझा, मी तुझी कोणीच रे मधले रे टाळता येईल का बघा. ठेचाठेच चा शेर नसता तर चालले असते असे मला वाटले.