हा प्रवास आधी मुळीच ठरला नव्हता
मी स्वतःहुनी हा रस्ता धरला नव्हता
शेरातील पहिल्या ओळीतील मुद्दाच दुसऱ्या ओळीत सांगीतलेला आहे असे माझे मत आहे.
खरे आहे. असेच वाटते आहे आहे.
हा प्रवास ठरला नव्हता अन मी ठरवला नव्हता
किंवा मी चुकून ह्या रस्त्याला लागतो होतो. किंवा मला कोणीतरी भाग पाडले होते.
मी कधी तुझ्या निष्ठांची किंमत केली?
एवढा तुझा पण भाव घसरला नव्हता
या शेरामधील 'पण' हा इंग्रजी 'बट' या अर्थी आहे की इंग्रजी 'अल्सो' या अर्थी आहे हे कृपया सांगावेत.
दोन्ही अर्थ यावेत म्हणूनच पण. पण सुरवातीला आला असता तर तुमच्या मनात वरील शंका आली नसती. या गझलेतल्या इतर काही द्विपदींबाबतही असाच विचार करून बघा.
एवढ्यात काही विशेष लिहिले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता - पुलस्तीसाहेबांच्या शेराची आठवण झाली.
लिहीत नाही जेव्हा माझे चार दिवस ते सुखात जाती
हाय पुन्हा मग दिसते काही, स्मरते काही... सुचते काही
पुलस्ती ह्यांचा वरील शेर उत्तमच आहे.
....मात्र, आपली ही गझल आपल्या इतर गझलांच्या तुलनेत मागे आहे हे माझे स्पष्ट मत आहे.
मला ही गझल मागेच म्हणजे जवळपास दोन वर्षांपूर्वी सुचली होती. काही मित्रांच्या बर्याच दिवसांच्या सांगण्यावरून कालपरवा प्रकाशित केली. प्रत्येक गझलेचा बाज, मूड, पोत वेगळा असू शकतो. त्यामुळे तुलना फसव्या असू शकतात.