श्री मिल्या,
मी आपल्या गझलांचा निस्सीम चाहता आहे. त्या हक्काने हे लिहीत आहे.
१. वरील रचना माझ्यामते सामान्य आहे.
२. ते जर विडंबन या अर्थाने रचले असेल तर तर ते विडंबनाचे कार्य करताना दिसत नाही.
३. मूळ जमीन उपलब्ध असल्यामुळे त्यावर 'विनोदी' काहीतरी रचायला माझ्यामते फार कष्ट पडत नाहीत. आपल्याकडे उत्तमोत्तम गझलांचा साठा असताना असे करण्याचा हेतू समजत नाही.
४. आपल्याऐवजी मला याच कवितेचे विडंबन करायचे असते तर मी सुरुवात अशी केली असती.
प्रेयसी - मालवून टाक दीप चेतवून अंग अंग
प्रियकर - भारनियमनामुळे मुळामध्येच दीप तंग