कसे फुलांचे फुलणे झाले बंद?
१ २ १ २ २ १ १ २ २ २ २ १ = १९
कसा चंद्रही अंधाराने व्याकुळ?
१ २ २ १ २ २ २ २ २ २ १ १ = २०
श्रावणातला पाउस येतो-जातो; = २०
वाट कुणाची कोणी पाहत नाही; = २०
प्रत्येक शेरात (मतला सोडून) पहिली ओळ २० आणि दुसरी १९ मात्रांची आहे. कृपया वृत्त सांगावे. मला माहित नाही.
शहरामध्ये अमाप गर्दी झाली;
मनुष्य तरिही दिसणे झाले बंद!... हे सुन्दर.
'अजब' मनाला सुचेल ते-ते लिहितो;
'कोणासाठी' लिहिणे झाले बंद!... छान.
बाकी सांगायचे तर
वाट कुणाची कोणी पाहत नाही;
डोळे लावून बसणे झाले बंद!... यात पहिली ओळ जी आहे तशीच दुसरी आहे. शब्दाची कलात्मकता सोडली तर आशयाची पुनरावृत्ती आहे. बाकी इतर शेरातही अशीच पुनरावृती वाटते.
मला उगाचच वा! वा! करण्यात अर्थ वाटत नाही.