प्रत्येक गझलेचा बाज, मूड, पोत वेगळा असू शकतो. त्यामुळे तुलना फसव्या असू शकतात.

पूर्णपणे सहमत चित्त!

भूषण, तुमची मते तुमच्या विचारानुसार योग्यच आहेत, कारण प्रत्येक रचना ही कवीइतकीच वाचकाची-रसिकाचीही असते. मात्र त्याचवेळी कोणत्याही लेखक-कवीला जे आणि जसे म्हणायचे असते ते तसेच आणि त्याच शब्दांत म्हणण्याचाही अधिकार असतो.

त्यामुळे मला असे वाटते, माझे असे मत आहे, मला पटत नाही यासारखी समीक्षा जरूर असावी मात्र कवीने असे करायला हवे होते, हे काही योग्य नाही, कवीचे हे चुकले, कवीचा प्रयत्न फसला वगैरे स्वरूपाची समीक्षा करू नये असं मला वाटतं.

तुमचं याविषयी काय मत?