>(असे न करता, म्हणजे शेवटचे एकमेव लघ्वक्षर लघ्वक्षर म्हणूनच असलेली एक सुरेश भटांची (एकमेव? ) कविता आहे. कोणती बरे?)

 दंश
येणारा दिवस मला हेटाळत हसणारच
जाणारा दिवस मला जाताना डसणारच

वरवरच्या बोलण्यात गेली बघ रात्र सरून
मावळता चंद्र तुझे नाव मला पुसणारच

देताना हृदय तुला केला मी हा विचार-
'घेणारा घेणारच! देणारा फसणारच! '

हारूनही लाखवार माझी झाली न हार
मी माझ्या स्वप्नांना फिरफिरून पिसणारच!

माझे घर वाऱ्याचे अन् पायच पाऱ्याचे
मी जगास रस्त्यावर गाताना दिसणारच!

काही भलतेच लोक तेव्हा करतील शोक
तेव्हाही मी त्यांच्या आसवांत नसणारच!

----------------------------------------
ही आठवली, एकमेव आहे का ते ठाऊक नाही.