सन्माननीय ऋचाजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
मला तसे म्हणायचे नव्हते. काहीतरी गॅप आहे माझ्या म्हणण्यात अन आपण ते समजण्यात!
माझी मते -
१. कवीचा कवी म्हणून जो प्रवास होत असतो त्यात काळाप्रमाणे फक्त सुधारणाच होतात. म्हणजे एखादा कवी आधी चांगला होता अन मग तितका खास राहिला नाही, असे होऊ शकत नाही. चित्त साहेबांनी जेव्हा सांगीतले की ही रचना दोन वर्षांपुर्वीची आहे तेव्हाच प्रश्न संपला. कारण 'घसाऱ्यासारखे', वाटले बरे किती' यांच्याशी मी केलेली तुलना चूक होती.
२. - प्रयत्न फसला वगैरे मी म्हणालेलो नाही. चित्त साहेब स्वतःच हे मान्य करतील की काही गजलांच्या रूपाबद्दल अथवा बांधणीबद्दल ते त्यांची मते व्यक्त करतात. त्यात हेतू अतिशय निर्मळ असतो की चर्चेमधून गझलेचा फायदा व्हावा. तशीच मते मी मांडली होती. नापसंत असते तर त्यांनी मला प्रतिसादच दिला नसता. ( इथे मी हे मान्य करतो की चित्तसाहेबांनी कुणाच्या गझलेवर अशी मते मांडणे हे योग्यच आहे, मी मांडणे तितके योग्य नाही. कारण माझा अनुभव बराच कमी आहे. ) तेव्हा आपण माझा प्रतिसाद या माझ्या शंका समजायला माझी हरकत नाही. त्यांच्या प्रतिसादामुळे माझा फायदा झाला. ( उदाहरण म्हणून - 'बोलणे त्याचे मनापासून ते' - या माझ्या गझलेतील त्यांनी त्यांना अनावश्यक वाटलेला शेर कुठला हे सांगीतल्यावर मी तो काढून टाकला - हा माझा त्यांच्या प्रतिसादामुळे झालेला फायदा आहे )
असो. गैरसमज नसावेत.