भूषण - आपलेपणाने प्रतीसाद दिल्याबद्दल खूप आभार
१. वरील रचना माझ्यामते सामान्य आहे. >>> आपल्या मताचा मला पूर्ण आदर आहे.
२. ते जर विडंबन या अर्थाने रचले असेल तर तर ते विडंबनाचे कार्य करताना दिसत नाही. >> रुढार्थाने ह्याला विडंबन म्हणता येणार नाही.. कारण विडंबन हे मूळ कवितेच्या खूप जवळ (अर्थाने नव्हे तर वापरलेल्या शब्दरचनेनुसार) असते.. तसे इथे नाही इथे फक्त ती चाल (मी जमीन सुद्धा म्हणणार नाही) वापरली आहे.. हीला एक हास्यकविता म्हणता येईल... आणि लिहिण्याचा उद्देश तोच आहे..
३. मूळ जमीन उपलब्ध असल्यामुळे त्यावर 'विनोदी' काहीतरी रचायला माझ्यामते फार कष्ट पडत नाहीत. आपल्याकडे उत्तमोत्तम गझलांचा साठा असताना असे करण्याचा हेतू समजत नाही. >>> मान्य आहे पण गझल लिहाणाऱ्याने दुसरे काही लिहूच नये असे कुठे आहे... मी जेव्हा मला जे सुचेल ते ते लिहीत असतो.. ठरवून गझल लिहीत नाही तसेच ठरवून विडंबन ही... तशीही ही रचना ४-५ वर्षांपूर्वीची आहे... तेव्हा गझल काय असते ह्याचा मला गंध देखील नव्हता.
४. आपला हा प्रयत्न चांगला आहे.. जरूर करा असे एक विडंबन मला वाचायला आवडेल..
तुमच्या मुद्द्यांना मी खोडून काढतो आहे असे कृपया समजू नका... असेच निस्पृच प्रतिसाद देत चला..