राजमाची किल्ल्यावरील आगळ्यावेगळ्या अशा पहिल्याच दुर्गसाहित्य सम्मेलनाला सुमारे ५०० माणसे आली होती. आयोजकानी ५०० ची मर्यादा ठरविली होती.  त्यानुसार या सम्मेलनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. सम्मेलनाचे अध्यक्ष  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे दि. १४ च्या उदघाटनापासून ते दि. १५ च्या समारोपापर्यंत सम्मेलनात उपस्थीत राहिले होते.

दुर्ग साहित्य व दुर्ग संवर्धन या बाबत यापुढे काही ठोस कार्यक्रम हाती घेण्यासाठी सर्वांचा सक्रीय सहभाग पाहिजे आहे. सम्मेलनात सहभागी झालेल्या सर्वाना याबाबत लवकरच पत्र पाठवू. 

आपल्या काही सूचना असतील तर त्या गोनीदा दुर्गप्रेमी मंडळा कडे अवश्य पाठवा.

दुर्गसाहित्य सम्मेलन सुविहीतरित्या पार पाडण्यासाठी अनेकानी परिश्रम घेतले व उत्तम सहकार्य केले.  दुर्गसाहित्य सम्मेलनाचे संयोजक गोनीदा दुर्गप्रेमी मंडळ या सर्वांचे अत्यंत ऋणी आहे.

गोनीदा दुर्गप्रेमी मंडळा करिता

मुकुंद गोधळेकर

पत्ताः-

फ्लॅट नं. २अ /३०१, कैलाश पार्क सोसायटी
८०, नित्यानंद मार्ग, पनवेल  ४१० २०६
घरचा फोनः (२२) २७४६ ९३५१
मोबाइल फोनः ९२२३५ ७९६८५
                          ९०११७ ६८३४८
ई मेल : दुवा क्र. १