ज्योतिषशास्त्र आणि वैज्ञानिक शास्त्रे यातिल कही ठळक फरक
१. हे जरी खरे असले कि कोणतेही शास्त्र १००% अचुक अंदाज देत नाही तरी वैज्ञानिक शास्त्रातील सिद्धांत हे वारंवार व्यक्तिनिरेपेक्ष प्रयोग , अणि त्यातील निकालांचे सांख्यिकी (Staistics) च्या आधारावर केलेले विश्लेशण याने तपासलेले असतात. त्यशिवाय सिद्धांताला नियम (Law) अशी मान्यता मिळत नसते. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात अचुक निकषांप्रमाणे प्रयोग करून नियम पडताळून पहता येतात. नियामांना अव्हान देता येते व अव्हान सिद्ध झाल्यास नियम निकालात निघू शकतो. जसे न्युटनचा गुरुत्वाकर्षणाच नियम बाद झाला.( तरीही तो नियम वापरल जातो याचे कारण अवकाशातील ग्रह तारे इ. अतीजड वस्तुंबाबत तो थोडा चुकीचा असला तरीही. आपल्या दैनंदीन वस्तुंबाबत तो वापरण्यास सोप्पा आणि कमलीचा अचुक पण आहे हे वारंवार प्रयोगांनी सिद्ध झाले आहे. अतीजड वस्तुंबाबत मात्र तो वापरला जात नाही. )
याचामुळे वैज्ञानिक शास्त्रे १००% अचुक नसली ती अचुकतेच्या जास्तीत जास्त जवळ जातात. हवामानशस्त्रातील मॉडेल्स पण यास अपवाद नहीत. ती सुद्धा सांख्यिकी च्या निकषांवर परखलेली असतात. अथवा मॉडेल बाद होते. त्याची भाकीते जरी सध्या चेष्टेचा विषय असला तरी त्याची अचुकाता आणि उपयुक्तता किनऱ्यावरील मच्छीमारांना विचारावी. ज्योतीषापेक्षा हवामान शाळेचे अंदाज त्यांना जास्त विश्वासार्ह वाटतात.
२. वैज्ञानिक शास्त्रे स्वतः ला कायम बदलत असतात. जुने नियम बाद होउन त्याची जागा अधिक अचुक असे नवे नियाम घेतात. त्यामुळे या शस्त्रांच्या अंदाज वर्तवण्याच्या क्षमता अधिक अचुक बनत जातात. ज्यातिष शास्त्राचे नियम शेकडो वर्षा पासून तसेच आहेत.
३. ज्योतिषातील ग्रह ताऱ्यांचे गणित हे बरोबर आहे आणि प्रयोगांनी सिद्ध करता येत असले तरी. ग्रह ताऱ्यांच्या स्थितीचा, मानवी स्वभाव अणी घडामोडी यांच्या लावलेल्या संबंधाला कोणताच सबळ पुरवा नाही हेच खरे.