मासॉची एकूण कारकीर्द बघता व्हिस्टाबद्दल फारसे आश्चर्य वाटत नाही. आंतरजालावर शोधल्यास व्हिस्टाचे अनंत बळी सापडतील. व्हिस्टामध्ये ज्या-ज्या गोष्टी नवीन आहेत म्हणून त्यांची उदंड जाहिरात केली गेली त्या सर्व सपशेल फसल्या. उदा. व्हिस्टाचे ऑटोमॅटिक डिफ्रॅगमेंटेशन किंवा त्याहून भयानक असे यूएसी. बराच वेळ, मेहनत आणि चिकाटी असेल तर व्हिस्टामधील हजारएक अनावश्यक गोष्टी काढून जीवण बऱ्यापैकी सुसह्य करता येते.
आताच ऐकलेली बातमी अशी की मासॉ त्यांचे नवीन येणारे विंडोज ७ (याला मी सूरज का सातवा घोडा म्हणतो  ) व्हिस्टा असणाऱ्यांना अपग्रेडच्या स्वरूपात फुकट मिळणार आहे. आता ही बातमी चांगली आहे किंवा कसे हे तुम्हीच ठरवा. 
हॅम्लेट

अवांतर : नवीन सुविचार
व्हिस्टा वापरणारी माणसे तुमच्या-आमच्या सारखी हाडामासाची माणसे आहेत. या आपत्तीमधून बाहेर येण्यासाठी त्यांना गरज आहे आधाराची. त्यांना दूर लोटू नका. त्यांना आपले म्हणा.