प्रेम, वात्सल्य व त्यागमूर्ती असलेल्या आईची खरी प्रतिमा तिने कधीच डागाळू देऊ नये
खरी प्रतिमा या शब्दातच विरोधाभास आहे. आईच्या प्रतिमेखातर नंदेने आपल्या स्वत्वाचा बळी द्यावा असे तुम्हाला म्हणायचे आहे का? हाच त्याग अपेक्षित आहे का?
मला पटले नाही. नंदा ही प्रथम माणूस आहे. मग आई वगैरे.
त्यातून केवळ दुसऱ्या कोणालातरी हवे आहे म्हणून मुले 'काढली' तर तुम्ही लिहिता तसा उच्च प्रेमभाव तिच्याठायी निर्माण होईलच असे नाही.
शास्त्रीयदृष्ट्या मातेची ममता हा गुणधर्म माणसात 'उपजत' नाही. (जसा पुष्कळ पक्ष्यांमध्ये असतो. ) पण तो वेगळा मुद्दा आहे.