स्त्रीला मुलांची आवड असतेच, किंबहुना असायलाच हवी असा समाजाचा अलिखित नियम असला तरी प्रत्यक्षात ते खरे नाही. सर्व स्त्रियांना मुले असावीत, त्यांना वाढवावे वगैरे आवडी नसतात, तरी एकदा लग्न केले की मानसिक घडणीमुळे आणि सामाजिक दबावामुळे मुले, किमान एक मूल तरी झालेच पाहिजे असा अट्टाहास असतो, आणि तो पुरुषाचाच असतो असे नाही तर स्त्रियांचाही असतो. अश्याने आवडीने नाही तर कर्तव्य म्हणून मुलांना वाढवले जाते. हल्ली विवाहपूर्व समुपदेशनाची पद्धत सुरू होऊ पाहते आहे, ती योग्य आहे. मुले हवीत की नकोत, हवी असतील तर किती, ह्याचा जोडप्यांनी लग्नापूर्वी विचार आणि त्यावर एकमेकांची मते आजमावून पाहिले पाहिजे आणि इतर गोष्टींबरोबरच मुलांच्या बाबतीत एकमेकांच्या विचारांची अनुरुपता पडताळून पहायला हवी.
मृदुला वर म्हणाली तसे तुम्ही लिहिली आहे तीच स्त्रीची खरी प्रतिमा खरोखरच आहे का? मला मूल नको असे तिला वाटले तर ते चुकीचे आहे का? माझ्यामते तरी नाही.