ऋचा, मृदुला, वरदा प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

स्त्रीला मुलांची आवड असतेच, किंबहुना असायलाच हवी असा समाजाचा अलिखित नियम असला तरी प्रत्यक्षात ते खरे नाही. सर्व स्त्रियांना मुले असावीत, त्यांना वाढवावे वगैरे आवडी नसतात, तरी एकदा लग्न केले की मानसिक घडणीमुळे आणि सामाजिक दबावामुळे मुले, किमान एक मूल तरी झालेच पाहिजे असा अट्टाहास असतो, आणि तो पुरुषाचाच असतो असे नाही तर स्त्रियांचाही असतो. अशाने आवडीने नाही तर कर्तव्य म्हणून मुलांना वाढवले जाते.---

समाजाचा नियम काहीही असो पण प्रत्येक स्त्रीला मुलांची आवड असतेच असे नाही. अगदी बरोबर आहे. लग्न झाले आहे म्हणून मूल (आवड नसताना/नाईलाजाने) झाले असे मानले तरीही सर्वसाधारण मनुष्य स्वभावानुसार  पाळलेल्या पशू-पक्षी-अगदी मासे जे त्यांच्याबाजूने कुठलाही माणसाला कळणारा संवाद साधत नाहीत, त्यांच्यावरही प्रेम जडते. हे तर स्वतःचे मूल आहे.


 मला मूल नको असे तिला वाटले तर ते चुकीचे आहे का? माझ्यामते तरी नाही.

स्त्रीला मूल नको असे वाटणे मुळीच चुकीचे नाही. परंतु असे वाटत असतानाही मूल होऊ देणे चुकीचे आहे. नवऱ्यासाठी/समाजाच्या दबावाला बळी पडून मूल होऊ देणे हे चुकीचे आहे.


खरी प्रतिमा या शब्दातच विरोधाभास आहे. आईच्या प्रतिमेखातर नंदेने आपल्या स्वत्वाचा बळी द्यावा असे तुम्हाला म्हणायचे आहे का? हाच त्याग अपेक्षित आहे का?

नवऱ्याबरोबर कितीही टोकाचे मतभेद झाले तर त्या मतभेदांचा मुलांच्या अस्तित्वाशी संबंध जोडणे बरोबर आहे  का? स्वत्व हे मूल होऊ देताना दाखवले तर जास्त योग्य व मुलांसाठी न्याय ठरेल. मग त्याग ( सर्वसाधारण स्त्री हृदयात मुलांसाठी आपसूकच निर्माण होतो मग ते बलात्कारातून का झालेले असेना, कारण त्यात त्याचा दोष नसतो. ) करावाच लागणार नाही.


हल्ली विवाहपूर्व समुपदेशनाची पद्धत सुरू होऊ पाहते आहे, ती योग्य आहे. मुले हवीत की नकोत, हवी असतील तर किती, ह्याचा जोडप्यांनी लग्नापूर्वी विचार आणि त्यावर एकमेकांची मते अजमावून पाहिले पाहिजे आणि इतर गोष्टींबरोबरच मुलांच्या बाबतीत एकमेकांच्या विचारांची अनुरूपात पडताळून पाहायला हवी.

अगदी बरोबर. मुलाबाबतची मते भिन्न असल्यास तसे लग्न न करण्याचा ठामपणा हवा. आता करू नंतर पुढचे पुढे, अशा वृत्तीच्या स्त्रिया स्वतःबरोबर सगळ्यांनाच दुःख देतात. वात्सल्य, प्रेम, त्याग हे आईच्या ठायी असलेले मूलभूत भाव आहेत. कर्तव्य म्हणून पोरे काढून त्या मुलांना या साऱ्यापासून वंचित ठेवणे हा अन्याय आहे . अशा मुलांनी मात्र आईवर प्रेम केले पाहिजे अशी अपेक्षा ह्याच स्त्रियांमध्ये
प्रकर्षाने दिसून येते. ह्या दुटप्पी विरोधाभासास काय म्हणावे ?

स्त्रियांनी स्वतःचे स्वत्व /आत्मसन्मान  आपल्या  मतांशी प्रामाणिक राहून व स्वतः त्यांचा सन्मान करून दाखवला तर हे सारे प्रश्नच उदभवणार नाहीत.