यश किंवा अपयश मिळणार असते किंवा राग कमी वगैरे झाले असते तर सर्व जण आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले असते. पण असे होताना दिसत नाही.
माझ्या मते हा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्यांना अपेक्षित अनुभव येतात ते विश्वास ठेवतात. ज्यांना येत नाहीत ते ठेवत नाहीत. साधं आहे. किंवा ज्यांना विश्वास ठेवायचा ते ठेवतात ज्यांना नाही ते नाही ठेवत असं म्हणूया.
खडे घालण्याची पद्धत नटण्यापुरती मर्यादित होती नंतर तिला माणसाच्या भविष्याशी, यशापयशाशी जोडलं गेलं. आता त्यावर योग्य किंवा अयोग्य, करावे किंवा न करावे असे एकच उत्तर मिळणे अवघड आहे.
व्यक्तिशः माझा यावर विश्वास नाही.