ताट तू ढकलायचे नव्हतेस त्यावेळी तसे
काय आता दात मित्रा कोरण्याचा फायदा?
रोज कोणी वेगळा माणूस छद्मी हासतो
हाच आहे आरश्याला पाहण्याचा फायदा
- ह्या द्विपदी आवडल्या.
"हो न हो" हा हिंदी वाक्प्रचार मराठीत आयात करण्याचे काही विशेष कारण ? आणि हे जर मराठीतील 'हो न, हो' असेल तर त्या ओळीत ते का हवे हे समजले नाही. तीच ओळ
'हो, जरा थांबूच, पाहू थांबण्याचा फायदा'
अशीही करता आली असती.