"मालकाचा त्रास सोसावा कसा हे जाणले

हा तुझ्या हृदयात आम्ही राहण्याचा फायदा

ताठ केव्हा व्हायचे केव्हा पुरे वाकायचे
जो शिके त्यालाच पाठीच्या कण्याचा फायदा

रोज कोणी वेगळा माणूस छद्मी हासतो
हाच आहे आरश्याला पाहण्याचा फायदा

फार होतो त्रास मोठे व्हायचे म्हणजे इथे
घेत जाऊ फक्त मोठे भासण्याचा फायदा"               ... ह्या द्विपदी खास !