कथा आवडली, लेखनशैलीही आवडली. पण कथा पूर्ण झाल्यासारखी वाटली नाही. ह्या वीस वर्षांच्या काळात देशपांडेंनी त्यांचा चरितार्थ कसा चालवला? खाण्यापिण्यासाठी, खोलीच्या भाड्यासाठी पैसे कुठून आणाले? पूर्वीची नोकरी सोडून नवी धरली? नाव बदलले? शेजारपाजाऱ्यांना, नोकरी धरली असल्यास तेथील सहकाऱ्यांना स्वतःविषयी कोणती खरी/खोटी माहिती दिली? असे प्रश्न मनांत आले. शिवाय ते घरी परत आल्यावर बायकोची प्रतिक्रिया कशी झाली, तिने ती कशी व्यक्त केली ह्यावर तिसरा भाग लिहिलात तर तो रोचक होईल.