स्त्रीला मूल नको असे वाटणे मुळीच चुकीचे नाही. परंतु असे वाटत असतानाही मूल होऊ देणे चुकीचे आहे. नवऱ्यासाठी/समाजाच्या दबावाला बळी पडून मूल होऊ देणे हे चुकीचे आहे.
-------- हे चुकीचे आहेच, पण तरीही समाजात बाढताना लहानपणापासून मनांवर जे काही बिंबलेले असते त्यामुळे आपल्याला मूल नको अशी स्वतःचीच असली तरी ही इच्छा अनेकींना ओळखताच येत नाही. काहींनी ओळखली तरी आपल्याला मूल नकोसे वाटणे म्हणजे आपल्यात काहीतरी कमतरता आहे असे वाटणे, आपल्यात पुरेसे स्त्रीत्व नाही की काय? अशी शंका येणे असेही होऊ शकते, कारण तुम्ही लिहिल्याप्रमाणे "खरी प्रतिमा" हीच समाजात आणि त्यामुळे मनांत भिनलेली असते. मग त्यापेक्षा वेगळे काही वाटणे म्हणजे चूक असे वाटू शकते. शिवाय लग्नानंतर मूल हे समाजाने इतके गृहीत धरलेले असते की तुम्हाला स्वतःला काय हवे आहे पेक्षा समाज काय म्हणेल? आपल्या शारीरिक क्षमतांविषयी समाज/नातेवाईक शंका घेतील का? संबंध असलेल्या/नसलेल्यांच्याभोचक प्रश्नांना  उत्तरे कशी आणि काय द्यायची? हे ठरवण्याचे, आणि त्यानुसार वागण्याचे बळ अनेकांमध्ये नसते. शिवाय लग्नाआधी मूल हवे/नको बद्दल काहीच बोलणे झालेले नसेल, तिला/त्याला मूल नको पण त्याला/तिला हवे आहे म्हटल्यावर एकमेकांच्या इच्छेच्या दबावाला बळी पडणे सहज शक्य असते.

स्त्रियांनी स्वतःचे स्वत्व /आत्मसन्मान  आपल्या  मतांशी प्रामाणिक राहून व स्वतः त्यांचा सन्मान करून दाखवला तर हे सारे प्रश्नच उदभवणार नाहीत.
--------- अगदी मान्य. मात्र तसे करणे बहुधा अनेकींना शक्य होत नाही ही तेवढीच खरी गोष्ट. मूल झाले असेलच तर मुलांवर ह्याचा परिणाम होणार नाही ह्याची काळजी घेणे हे योग्यच.