मालकाचा त्रास सोसावा कसा हे जाणले
हा तुझ्या हृदयात आम्ही राहण्याचा फायदा.... वा वा!!

ताठ केव्हा व्हायचे केव्हा पुरे वाकायचे
जो शिके त्यालाच पाठीच्या कण्याचा फायदा... मस्त

रोज कोणी वेगळा माणूस छद्मी हासतो
हाच आहे आरश्याला पाहण्याचा फायदा... सही आहे

फार होतो त्रास मोठे व्हायचे म्हणजे इथे
घेत जाऊ फक्त मोठे भासण्याचा फायदा.... फारच आवडला

घेतला नाहीच आपण भांडण्याचा फ़ायदा
काय आता भांडणे ती काढण्याचा फायदा?

मी तुझी आहे तुझी आहे तुझी आहे तुझी
लाटला आहेस थापा मारण्याचा फायदा... हे ही शेर छान आहेत

मतला मला नीटसा स्पष्ट वाटला नाही... थांबून एकदातरी (मागे) बघावेसे वाटणे हा ही चालण्याचा फायदा आहे..असे आपल्याला अभिप्रेत आहे का?.. मग असे काहीसे केल्यास

पाहणे थांबून हा ही चालण्याचा फायदा.. (हे सुद्धा इतके चपखल नाहीये)

-मानस६