१. ) श्री मिलिंद फणसे साहेब, माझा असे म्हणण्याचा प्रयत्न होता की 'फायदा होवो न होवो, थांबून पाहूच'. ( हिंदी पद्धतीचेच, पण ते बऱ्याच अंशी प्रचलीत आहे असा माझा समज झाल्यामुळे घेतले. )

२. श्री सतीश साहेब - धन्यवाद

३. श्री मानस साहेब - 'थांबावेसे वाटत नाहीये किंवा थांबायला जमत नाहीये, पण तरीही कसेतरी थांबून पाहूचयात की काय फायदा होतो ते, कदाचित थांबणे हा देखील चालण्याचा फायदा असावा, म्हणजे इतके चाललो म्हणून तर थांबता आले, चाललोच नसतो तर थांबलो तरी कसे असतो' असे म्हणण्याचा माझा प्रयत्न होता.

'मतल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागणे किंवा कुठल्याही ओळीचे स्पष्टीकरण द्यावे लागणे हे मी कवीचे अपयश समजतो'. प्रतिसादाबद्दल सर्वांचे खरच मनापासून धन्यवाद'

४. श्री चित्त साहेब - आपल्याला माझ्या काही ओळी आवडल्या हे खरोखरच माझ्यासाठी एक 'यश' आहे. आपल्या प्रतिसादाने नेहमीच बळ मिलाले आहे. आणि खरच, ती द्विपदी भाऊसाहेबांच्या शायरी सारखी झाली आहे हे आपण म्हंटल्यावर मलाही जाणवले. मनापासून सांगतो, की मला माझा शेर तसा व्हावा हे आवडत नाही. म्हणून मी तो शेर वगळत आहे.