राशींची / नवग्रहांची रत्ने घालून माणसाला खरं काय मिळत असेल तर आपली दुःखं / त्रास अडकवून आपल्या खांद्यावरचं ओझं कमी करण्यासाठी एक खुंटी! म्हणजे आता मी हे घातलं आहे ना, मग माझा त्रास कमी होईल, असा विश्वास जर मला वाटला तर माझा आत्मविश्वास वाढतो, डोकं शांत होतं आणि परिणामतः प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यायची क्षमता वाढते, त्यामुळे त्या परिस्थितीचा त्रास आपल्याला खरंच कमी होतो.

इतर कशाहीप्रमाणे याचाही निव्वळ देखावा करणारे, बुवाबाजी आणि "धंदा" करणारे असतात, त्यांचा निषेध!!!

पण इतरांना वेठीस न धरता / कोणाच्या भूलथापांना बळी न पडता स्वतःची सोय / श्रद्धा / हौस म्हणून थोडंसं मन शांत व्हावं म्हणून कुणी या मार्गाचा आश्रय घेत असेल तर त्याला पूर्ण चूकही म्हणवत नाही मला. अशा पातळीवर मला वाटतं हा प्रश्न वैयक्तिक आहे.