माणसाला अधुरं आयुष्य नाहीच आवडत. पूर्णत्वाची त्याला खूप ओढ असते. गणिती कल्पना करतानाही मला अपूर्णांकाचं आयुष्य नको तर इंटिजर (वास्तव संख्या?) व्हायची ओढ आहे. ही कल्पना छान आहे.
(पूर्ण संख्या म्हणजे शून्यापासून सुरू करून अपूर्णांकांव्यतिरिक्त धन संख्या होत. सर्व पूर्ण संख्या इंटिजर असतात इतकं नक्की आठवतं. आणि इंटिजर म्हणजे अपूर्णांकांव्यतिरिक्त धन-ऋण सर्व संख्या हेही आठवतं पण इंटिजरला मराठीत काय म्हणतात? वास्तव संख्या ना? नकी आठवत नाही; पण तसं गृहीत धरते इथे.)
नुसतं पूर्ण व्हायचं नाही तर वास्तव, खरं व्हायची ही ओढ भावणारी आहे.
जाता जाता : सुमार चित्रपटांत काव्य-संगीत बरेचदा उच्च दर्जाचं असतं, बॉलिवूडमध्ये तरी, नाही का?