काही विशेष नाही हो, आमच्या अन्नू मलिक-सुमार कानूलाही मिळालं असत ऑस्कर. पण त्यांच्या ओळखी नाहीत ना. सगळा कॉंटॅक्टचा गेम आहे, दुसर काय? नाहीतर असे कैक चित्रपट आमच्या सुभाष घईंनीही बनवले होते. आता तो ताल चित्रपट घ्या, (अस म्हटल तर लोक गप्पा अर्ध्या टाकून पळून जातात असा आमचा अनुभव आहे.
) त्यातला इंटरव्हलपर्यंतचा अक्षयचा अभिनय पाहून आम्ही खुर्चीतून पडायचे बाकी होतो. (इंटरव्हलनंतर खुर्ची सोडून खाली बसलो. ) पण
मिळालं का त्याला ऑस्कर? नाही. कारण शेवटी आम्ही पडलो ब्राउन कातडीचे,
गोऱ्यांना कसे सहन होणार आमचे घई आणि
जोहर? (आम्हालाच सहन होत नाहीत, तर गोऱ्यांच काय?
)
असो.
हॅम्लेट