रानवेड्या पाखराशी भेट झाली त्या कळीची

का हव्याशा  वाटणाऱ्या आठवांना टाळले मी
फक्त  आहे तीच सोबत हेच होते मानले मी

 येथे माझ्यामते दुसऱ्या ओळीमध्ये 'का' चा फील येत नाही. म्हणजे 'तीच एक सोबत आहे असे मी का मानले' असे म्हणायचे आहे असे वाटत नाही. प्रॉबेबली याचे कारण हे असावे की वरील ओळीतील 'का' खालच्या ओळीला लागू होताना दिसत नाही. जर दुसऱ्या ओळीमध्ये 'का' असे म्हणायचेच नसेल तर पहिल्या ओळीतील 'का' गैरलागू वाटतो. म्हणजे पहिल्या ओळीत प्रश्न असेल तर एक तर दुसऱ्या ओळीत त्याचे उत्तर तरी हवे किंवा दुसरा प्रश्न तरी हवा अशी अपेक्षा मनात आली.  एकच भावना एकदा प्रश्नार्थी व एकदा विधानार्थी आल्याने फुलफिलमेंटचा फील आला नाही.


....................................................
फोन नंबर दे म्हणाला तो मलाही शेवटी.. मग-
भेटण्याचे, लाजण्याचे..   हे... मनोरे बांधले मी 

 छान शेर! अल्लड तरुणीच्या भावना साकार करणाऱ्या ओळी!

  रानवेड्या पाखराशी भेट झाली त्या कळीची
अन  फुलाला जागण्याचे  भान आले... जाणले मी

 हाही तसाच! पण या उपमा जरा 'बऱ्याच वापरलेल्या' अशा वाटल्या.

............................................
आज माझ्या सोबतीची का धरावी आस त्याने ?
जीवघेणे  पावसाळे एकटीने काढले मी

सुंदर! इथे खरी गझलेला सुरुवात झाली.

बोलतो तो एक.. करतो वेगळे काही.. तरीही
(नाटकी त्या बोलण्यावर केवढे हे भाळले मी)

मूड व्हेरी वेल मेंटेन्ड!

आणले पैसे कसे  ही  चौकशी  तू का करावी?
खर्च केला कोणता तू  काय केले... काढले मी?

व्वा! एकदम षटकार! इथे 'पैसे' म्हणजे 'पैसे'च समजू नये. पैशाची उपमा सुखाला आहे असे समजून पाहावे. मी सुखे कशी मिळवली हे तू का विचारतोस? माझ्या सुखात सहभागी करून तुला मिळवून दिलेल्या सुखांचे तू काय केलेस कधी विचारले का मी? तसेच, पैसे म्हणजे पैसेच मानले तरी उत्तम शेर! कारण  स्त्रीने पैसे कुठून आणले हे विचारण्याची पुरुषांची पारंपारिक सवय आहे. ते पैसे वापरण्याची सवयही काही पुरुषांना असते. ते वापरून परत त्याच स्त्रीला मारहाण करणारेही पुरूष आहेत. सर्वांवर चांगल्या शब्दरचनेमधून सणसणीत टीका करणारा शेर!

गप्प असणे, वाकणे ही संमती नाहीच माझी..
 बांधलेली गाय बकरी  का कुणाला वाटले मी?

 आणखीन एक षटकार! पण हा षटकार फक्त पहिल्या ओळीत आहे. मी गप्प बसणे किंवा वाकणे ही माझी संमती समजू नये. ( मी किती कर्तृत्ववान / सामर्थ्यवान आहे हे तुम्हाला समजेल तेव्हा तोंडे पाहण्यासारखी होतील ). मात्र दुसऱ्या ओळीत फक्त वेगळ्या शब्दात तेच सांगीतले गेले आहे. ( मला निरुपद्रवी अन गरीब समजू नका असे ). इथे काहीतरी वेगळे ऐकायला मिळायला पाहिजे होते. ( जसेः तुम्हाला पूरुषार्थ गाजवता आला याचे समाधान मिळावे म्हणून मी गप्प बसते वगैरे ).

एकंदर उत्तम! मी वाचलेल्या 'मी बोचलो म्हणाले' अन इतर काही गझलांपेक्षा खूपच उंचावरची गझल!

अभिनंदन!