मित्र मैत्रीणींनी एकमेकाला 'टेक केअर' असं म्हणणं हे नविनच सुरू झालेलं फॅड आहे असं माझं मत आहे.  आई वडिलांनी, आजी आजोबांनी किंवा कुणीही वडिलधाऱ्या माणसानं जपून जा ग, किंवा काळजी घ्या वगैरे असा सल्ला किंवा आशीर्वाद देणं हे पूर्वीपासून सवयीचं होतं.  यात त्यांचं ममत्व आणि तुमच्या बद्दलची आपुलकी दडलेली असायची.  पण आपल्या समाजात समवयस्कानं असं म्हणण्याची कधीही पद्धत नव्हती.  त्यामुळे ते कृत्रीम वाटतंच शिवाय ते म्हणणारा स्वतःला अतिशहाणा समजतो असंही वाटतं.  मला तर कुणा समवयस्कानं 'टेक केअर' असं म्हटलं तर अक्षरशः अंगावर शहारा आल्यासारखं वाटतं.