विदर्भात किनवट भागात गुळ-भात खातात.
विदर्भात विशेषतः कुणबी लोकांकडे (गुळाच्या) पुरणपोळीसोबत साखरेचा पाक (किती ते गोड) किंवा तिखट सार (आमटीसारखा) खातात. सार मराठवाड्यातही खातात.
ग्लुकोज बिस्कीट पाण्यासोबत अप्रतिम लागते. . परदेशात राहिलं आणि शाकाहारी असाल तर भात कशाशीही खालला जातो. उदा. सॉस, कोरीअन करी (पाण्याला हळदीची फोडणी आणि नशिबवान असाल तर बटाट्याचे २-४ पातळ काप), किंवा नुस्ताच कोरडा भात.
नुस्ताच भात (पांढरा) खाणारे कोरीअन भात पोळीसोबत खाउ लागले तेंव्हा मीच त्यांना भाजीसोबत खा असं सांगितल.
तेलात तळलेल्या (किंवा भाजलेल्या) वस्तुंसोबत तुप खाणारेही बघितले.
मी खात नसलो तरी कच्ची मासोळी खाणारेही बघितले. असो.... खाण्यासाठी जन्म अपुला म्हणतात ते खोट नाही.
बाकी अजून चिनला गेलो नाही, नाहीतर यादी खुप जास्त लांबली असती....