विडंबन अशक्य सुंदर झाले आहे. एकेक ओळ वाचताना त्यातल्या श्लेषांवर , शब्दाच्या कसरतीवर , आणि हे सगळे करताना वृत्ताच्या , एकाच "थीम"च्या समतोलाला संभाळताना दाद द्यावीशी वाटत होती. "लागते खरेच काय? सांग नाविकास बोट" वर लोकांनी मुक्त दाद दिलीच आहे. (सर्वोत्कृष्ट ओळ !) त्याचबरोबर इंग्रजी आणि मराठी "नीट" शब्दावरचा श्लेष, पापडाचा अचूक वापर .... सलाम ! एव्हढेच म्हणतो.