डॉग म्हणजे कुत्रा ह्या अर्थाने डॅनी बॉयलना दाखवायचे नाही आहे. इथे डॉग हे 'अंडरडॉग' ह्या अर्थाने वापरले आहे.
जमाल हा केबीसी स्पर्धेमध्ये अंडरडॉग असतो. तो जिंकणार असे कुणालाच वाटत नसते म्हणून तो अंडरडॉग.
आणि अंडरडॉग असणारा हा स्पर्धक जिंकणार असे वाटत नसले तरी जिंकावा असे नेहमीच प्रेक्षकांना वाटत असते.
म्हणून त्याला इतका पाठींबा/लोकप्रियता मिळतो.
थोडक्यात झोपडपट्टीतला अंडरडॉग म्हणून स्लमडॉग.