समीरजी,
आपला प्रतिसाद वाचल्यावर लिहावेसे वाटले. ( खालील मते माझी वैयक्तिक मते आहेत. )
भाऊसाहेब पाटणकरांनी मराठीत आणलेली शायरी ही कधीच वृत्तबद्ध नव्हती. तसेच त्यांनी गझलतंत्र वापरून ती शायरी केली नाही. माझ्यामते त्यांची 'तथाकथित' शायरी ही सामान्य अभिरूची असलेल्यांना खूप आवडेल अशी होती.
त्यांच्या शायरीतील सहज डोळ्यासमोर येणाऱ्या त्रुटीः
१. वृत्त नसणे
२. गझलतंत्र नसणे
३. सवंगता
४. उर्दू शायरांची मराठी शायरांबरोबर उगाचच केलेली तुलना व टीका
५. अत्यंत किरकोळ उपमा, शब्दरचना व कल्पना!
आज त्यांच्या नावावर शायरीचे कार्यक्रम करून लोक पोटे तर भरत आहेतच पण किताबही मिळवत आहेत. तेही त्यांचेच शेर वाचून, स्वतःचे काहीच निर्माण न करता!
ज्या विनोदांना हसण्यासाठी अत्यंत कमी विनोदबुद्धी व क्षमता लागते अशा विनोदांनी त्यांची शायरी ठासून भरलेली असायची.
निदान भटांनी गझलेचे जे तंत्र मराठी माणसाला शिकवले ते तरी त्यांनी उपयोगात आणायला हवे होते.
मात्र एक - त्यांनी किंवा त्यांच्या अनुयायांनी कधीच हा दावा केला नाही की ते गझल करतात.
( अवांतर - माझ्या 'फायदा?' या नुकत्याच, इथेच प्रकाशित झालेल्या गझलेतील एक शेर त्यांच्या शायरीची आठवण करून देतो असा श्री चित्त यांचा प्रतिसाद आल्यावर मलाही ते जाणवले व मी तो शेर काढून टाकण्याचा प्रयत्न केला. पण संपादन सुविधाच न दिसल्यामुळे तो तसाच ठेवावा लागला. )