विश्वास असू द्या, आपण सज्जनांच्या जगात राहतो. असे चांगले अनुभव आपल्या देशात ही हजारदा येतात. हीच तर जगण्यातील आनंदाची गोष्ट!
लक्षात ठेवण्याची अणखी एक महत्त्वाची गोष्ट- दुर्जन देखील येथेच राहतात. सज्जन कोण आणि दुर्जन कोण ते आधी सांगता येत नाही. एखाद्या सज्जनाला सुद्धा मध्येच कधी तरी दुर्बुद्धी सुचते. म्हणून सावध राहायचे.
पण तरी ही प्रत्येक गोष्टीत संशयाचे वातावरण ठेवाल तर जगणे मुश्कील!
सदैव चांगल्याचीच अपेक्षा ठेवायची!