आपल्याला आपल्या प्रारब्ध/क्रीयामाण अथवा संचिताचा हीशेब का सांगीतला जात नाही? टार्गेट नसेल तर काम कसे करायचे?

टार्गेट आपल्याला (शरीराला) नाही आत्म्याला आहे आणि त्याला त्याचे टार्गेट माहीत आहे. आत्मा शरीर घेऊन टार्गेट पूर्ण करतो. शरीराकडून मिळणारी मदत संपली (आत्म्यानुसार) की तो एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. मग त्याला अपेक्षित कार्य शरीर नवजात असताना किंवा २२/२३ वर्षांचे असताना पूर्ण झाले तर तो आपल्याला तेव्हाच सोडून जातो. आत्म्याचे टार्गेट ज्याच्या शरीरात असताना पूर्ण होते तेव्हा आत्म्याला मोक्ष मिळतो. त्यामुळे आपण काय होईल याकडे न पाहता आपले काम करत रहायचे तेच आपले प्रारब्ध आहे असे ह्या श्लोकात सांगायचे असावे असे मला वाटते. युद्ध करणे हे अर्जुनाचे काम आहे असेच कृष्ण त्याला समजावून, पटवून सांगत आहे, असे वाटते.

महाभारतकाळाचा विचार केला तर, त्या काळात अपम्रुत्यूंचे प्रमाण दुर्मिळ किंबहुना नव्हते. त्यामुळे तरणेबांड शरीर वा बाल शरीर सोडून जाण्याचा प्रश्नच येत नव्हता.

महेशकुमारजी,

वरील विधानाला पुरावे द्याल?

माझ्याकडे बालमृत्यूची व अपमृत्यूची काही उदाहरणे आहेत : श्रीकृणाची पहिली ६ भावंडे जी कंसाने मारली, अश्वत्थाम्याने उतरेच्या गर्भावर सोडलेले ब्रह्मास्त्र, तसेच घटोत्कच, अभिमन्यू, युद्धात मरण पावलेले लाखो सैनिक  (वीरमरण) पंडू, विचित्रवीर्य (नैसर्गिक मृत्यू), लाक्षागृहात मारली गेलेली पाच मुले व एक स्त्री (अपघाती मृत्यू) इ.

दुसरे म्हणजे आपल्याला महाभारतातील राजघराण्यांचाच इतिहास  माहीत आहे. सामान्य जनतेविषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे तिथे काही अपमृत्यू झालेच असतील तर ते कळणे आता दुरापास्त आहे. म्हणून एकदम एव्हढे मोठे विधान करता येणार नाही असे वाटते.