नमस्कार

१. आजकाल बहुधा आत्मविश्वास असलेले डॉक्टर कमी झाले असावेत. कारण "बहुधा असं काहीतरी तुम्हाला झालं असावं" असं बरेच डॉक्टर सांगतात पण खात्रीशीरपणे सांगू शकत नाहीत.

२. स्पेशलायझेशनच्या या युगात सामान्य आरोग्यलक्षणं आणि बहुतकरून सर्व प्रकारचे रोग-आजार यांची माहिती असणारे जनरल म्हणजे सर्वव्यापी(! ) / सर्वंकष उपचार करणारे डॉक्टर कमी असतात. ते त्यांच्या विशेष क्षेत्रात निष्णात असतात पण इतर बाबतीत तितकेसे तज्ज्ञ नसतात. म्हणून उगाचच "रिस्क" टाळतात

डॉक्टरांचा आत्मविश्वास नाही पण विशेष अवयवांमध्ये तज्ञ होण्याची प्रथा आहे.

३. डॉक्टर आणि पॅथॉलॉजिकल प्रयोगशाळांचं साटंलोटं हे असतंच. त्याला काही अंशी पर्यायही नाही.

प्रयोग शाळेवालेही डॉक्टरच, एकमेका सहाय्यकरू अवघे धरू सुपंथ....

४. पूर्वी तसे आजारही मर्यादित आणि साधे होते हो. हे मी उपहासाने नाही, जाणीवपूर्वक म्हणतेय. जसजसं वैद्यकशास्त्र प्रगत होत चाललंय तसतसे रोगांचे, आजारांचे प्रकारही अधिकाधिक होत चालले आहेत. संख्येनेही आणि तीव्रतेनेही. आपण जे निदान केलं ते चुकावं आणि रुग्णाला प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच झालेलं असावं आणि योग्य उपचाराअभावी दुखणं बळावावं, चुकून काहीतरी घडावं आणि रुग्णाला महागात पडावं / जिवावर बेतावं असं काही कोणत्याही डॉक्टरला वाटत नसणार? मग काय खात्री करण्यासाठी एकामागोमाग एक चाचण्या सांगितल्या जातात आणि काय!

नाही पूर्वीही आजार तितकेच होते, पण त्याचा शोध आता आपल्या प्रगत विज्ञानाने लागत आहे.

५. शिवाय काही रुग्णही फार काळजी करणारे असतात. त्यांना वारंवार स्वतःला विविध प्रकारे तपासून घेण्यात बरं वाटत असतं. अशा लोकांना त्या तपासण्या वारंवार करू देण्यापेक्षा वेगळा पर्याय कधीकधी डॉक्टरांकडे नसतो! अर्थात अशा "केसेस" खूप कमी असतात पण असतात, हे नक्की.

त्यांला स्वप्रेम म्हणतात....