मा. भूषण कटककर साहेब,

छान मुद्दा मांडलात आपण चर्चेत (याला मी भांडण समजत नाही.)

जर शांतपणे विचार केला तर असं दिसेल की कोणी काय परिधान करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. समाजाचे काही संकेत आहेत परंतु ते केवळ संकेत आहेत, नियम नव्हेत. त्याचप्रमाणे सभ्यपणे वागण्याचे पण संकेत आहेत (म्हणजे टक लावून न पाहाणे इ. ). एखाद्या युवतीने संकेत झुगारून अंग उघडे टाकणारे कपडे घातले तर इतरांच्या संकेतांत भर पडून त्यानी डोळे बंद करून घ्यावेत का?  आणि इतरानी पाहू नये असं वाटत असेल तर असे कपडे कोण घालेल?

माझा आधीचा प्रतिसाद आपणास थोडा टवाळखोरीचा वाटला असेल, परंतु या विषयात खेळकरपणा आवश्यक आहे. स्वयंभू संस्कृतीरक्षक होउन अशा युवतींवर हल्ला करायचीही गरज नाही आणि असभ्य होउन त्यांचा विनयभंगही करायची गरज नाही आणि स्वतःच्या नैसर्गिक भावनांशी अप्रामाणिक राहून काहीतरी अपवित्र दिसतय असा आव आणायचीही गरज नाही.

राहता राहिली माझ्या घरातल्या स्त्रियांची गोष्ट. त्यानी काय कपडे घालावे हे मी सांगत नाही आणि त्यांच्याकडे कोणी नुसतं पाहिल्याने काहीही फरक पडत नाही हे मला माहिती आहे.