उमलू नकाच केंव्हा
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा
यातली अपूर्णतेची गोडी चिंटू वाचताना चाखायला मिळते. चिंटूचं गोंडस बालपण अबाधित राहिलेलं पाहून कुठेतरी खूप छान वाटतं आणि हरवून गेलेल्या आपल्या बालपणाशी जोडणारा तो एक रंजक दुवा होऊन जातो. त्याला मोठं केलं तर हे सगळं हरवेल. चिंटूला लहानच राहू दिलं तर नाही का चालणार?
नाही म्हणायला काही वर्षांपूर्वी गोष्ट नावाच्या एका एकांकिकेत चिंटू मिनी पप्पू आणि बगळ्या अशी पात्रं होती. याच नाटकाच्या संस्कृत रूपांतराला राज्य नाट्य स्पर्धेमध्ये बक्षीसही मिळालं होतं असं आठवतंय. इंजिनीअरिंगकॉलेजात जाणारा आणि शंभरातून दोन नाहीतर चारच टक्के मार्क्स कमी असणारा पुस्तकी किडा बगळ्या पाहताना खूप मजा वाटली होती. सुहृद गोडबोलेनं ते काम सुरेखच केलं होतं .
--अदिती