गाव माझाही उजळला?
चांदणे चुकले असावे!
 - वा. 'गुंतणे'ही आवडले.

अवांतर : छोटा बहर - तोही अर्ध्याहून अधिक रदीफने व्यापलेला - तुम्ही उत्तम निभावलेला आहे ह्यात शंका नाही. मात्र अशा परिस्थितीत प्रसंगी अभिव्यक्तीचा श्वास गुदमरू शकतो हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही. ह्या विषयी तुमची, इतर गझलकारांची व वाचकांची मते जाणून घ्यायला आवडेल.