मला वाटते ह्याला तीन कारणे आहेत:

१. आपण म्हटल्याप्रमाणे क्लिनिकल तपासणी करण्याचे कौशल्य कमी झालेले आहे.

२. तपासण्या करणाऱ्या लॅब्स व तेथे पाठवणारे डॉक्टर्स ह्यांच्यातील साटेलोटे.

३. ग्राहकांचे वाढते मेडिको- लीगल भान. ह्यामुळे डॉक्टरांनाही 'सेफ-प्ले' करणे जरूरीचे भासत असावे. परदेशात, विषेशतः प्रगत देशांत हे कारण विशेष लागू आहे.

ही तीन कारणे प्रत्येक केसमध्ये असतील असे मी म्हणत नाही. १ व ३ ही सर्वसाधारणपणे वाढत्या प्रमाणात लागू होत असावीत असे वाटते.